मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने व्हिडीओ पार्लरवर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान पार्लरमधील एका ग्राहकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मुलुंड येथे घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
व्हिडीओ गेम खेळण्यासाठी व्हिडीओ पार्लरमध्ये
दिलीप शेजपाल (५०) असे मृत्यू झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. कल्याणच्या खडकपाडा येथे राहणारे शेजपाल हे भांडूप येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. गुरुवारी सायंकाळी ते कलेक्शनचे काम आटपून मुलुंड पश्चिमेतील जठा शंकर मार्ग येथील इमारतीत असणाऱ्या संगम व्हिडीओ पार्लरमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यासाठी गेले होते.
( हेही वाचा: मागील 4 महिन्यांत काश्मिरात 62 दहशतवादी ठार )
दरम्यान मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या पथकाने या व्हिडीओ पार्लरवर छापा घातला, छापेमारी सुरू असताना दिलीप शेजपाल या ग्राहकाला अचानक फिट आली, त्यांना उपचारासाठी अग्रवाल रुग्णालय येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेजपाल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत काही कळू शकलेले नसून त्यांचा मृतदेह मुलुंड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community