मुंबई एसी लोकलच्या दरांत कपात व्हावी अशी मागणी मुंबईकरांकडून होत होती. एसी लोकलचा दर खूप असल्याने प्रवासी त्यातून प्रवासही करत नव्हते. त्यामुळे आता एसी लोकलचे दर 50 टक्क्यांनी कपात करण्यात आले आहेत. अतिशय किफायतशीर दरामध्ये मुंबईकरांना लोकल ट्रेनचा प्रवास करता यावा, यासाठी दर कमी करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्राचे आभारही मानले आहेत. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते.
आता प्रवाशांची पसंती असेल
मागच्या काही दिवसांपासून एसी लोकल प्रवासाच्या तिकीट दरांबाबत दिलासादायक निर्णय येईल, याची कल्पना मुंबईकरांना होती. मात्र कपात फार फार तर वीस किंवा तीस टक्के होईल, असे बोलले जात होते. त्याबाबतचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेला. मात्र अखेर वीस अधिक तीस अशी गोळाबेरीज करत थेट पन्नास टक्केच कपात एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये करण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता तिकीट दरांतील कपातीनंतर मुंबईतील प्रवाशी एसी लोकलला पसंती देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.
View this post on Instagram
( हेही वाचा: ‘बेस्ट’मधील नव‘चैतन्य’ कोणासाठी? )
..म्हणून तिकीट दरांत कपात
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने काही एसी लोकलदेखील चालवण्यात येतात. मात्र या लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवाशी संख्या वाढावी यासाठी तिकीटीचा दर कपात करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community