राज्यातील नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सल्ले देणारे आणि मार्गदर्शन करणारे राजकीय नेते मंडळी देखील स्वतः नियमांचे उल्लंघन करू शकतात. याचे एक उदाहरण समोर आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वत: सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, असे अनेक सल्ले नेतेमंडळी देताना पाहिले आहे. प्रशासकीय, पोलीस यंत्रणा आपला सर्व धाक, कायद्याची भीती ही सर्वसामान्य लोकांनाच दाखवते मात्र त्यांच्यासाठी कायद्याची भिती नसते का? असा सवाल सध्या आम जनतेकडून विचारला जात आहे.
वाहतूक नियम मोडण्यात ‘हे’ मंत्री आघाडीवर
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून झाल्याने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी त्यांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवर असून त्यांच्यासह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – “…हे बघून हसावं की रडावं”, निलेश राणेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल)
कोणत्या नेत्याकडे किती दंड बाकी?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर सर्वाधिक १४,२०० रुपये दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ५,२०० रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
- औरंगाबादमधील एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर चार केसेस दाखल असून ४ हजारांचा दंड त्यांच्यावर आहे.
- शिवसेना विधान परिषद नेते अंबादास दानवे
केसेस :४
दंड : ३,४०० - गंगापूर येथील भाजप आमदार प्रशांत बंब
केसेस:९
दंड: ७,४०० - कन्नडमधील शिवसेना नेते उदयसिंग राजपूत
केसेस: ९
दंड: ७,०४० - फुलंब्री येथील भाजप नेते हरिभाऊ बागडे
केसेस: ४
दंड : ३,२०० - पैठण येथील शिवसेना मंत्री संदीपान भुमरे
केसेस: ३,
दंड: २,४००
Join Our WhatsApp Community