रोड हिप्नोसिस म्हणजेच रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती असून जी बहुतेक चालकांना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहित नसते. पण तुम्ही वाहन चालवत असला तर तुम्हाला ‘रोड हिप्नोसिस’ या संकल्पनेबद्दल नक्की जाणून घेतले पाहिजे.
रोड हिप्नोसिस म्हणजे रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी चालक उतरल्यानंतर अडीच तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु जे समोर असते ते मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि जे काही चालक पाहतो त्याचे त्याला आकलन होत नाही.
…तर तुम्ही रोड हिप्नोसिसच्या बळी पडला हे नक्की
रोड हिप्नोसिस हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. रोड हिप्नोसिस झालेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या वाहनाचा वेग किती आहे, याचे विश्लेषण वाहन चालक करू शकत नाही, याचाच अर्थ म्हणजे वाहन चालक रोड हिप्नोसिसच्या बळी पडला आहे.
कसे कराल स्वतःचे संरक्षण?
- रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर अडीच तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
- वाहन चालवताना काही ठिकाणं आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
- रोड हिप्नोसिस हे शक्यतो रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
- चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
- डोळे उघडे असले तरी मनात दुसरा विचार असेल तर अपघात अटळ आहे
- गाडी चालवता चालवता ब्लँक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दिर्घ श्वास घ्या आणी फ्रेश होऊन मग पुन्हा प्रवास सुरू करा.