भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. युतीच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडलेल्या आहेत. आमची औपचारिक बैठक देखील झालेली नाही, कोणता प्रस्ताव देखील त्याबाबत नाही. अलीकडील काही काळात राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्या आम्ही देखील मांडत आहोत. मात्र आमची अजून चर्चा झालेनी नाही, असे फडणवीस म्हणाले.
मनसेच्या भूमिकेवर संशय
१ मे रोजी ओरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याआधीच या सभेला भाजपचा पाठिंबा आहे. मनसेची भूमिका भाजपाची आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, भाजप आणि मनसेच्या युतीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने हिरवा कंदील दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजप मनसे युतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टी कोणत्याही पक्षाला सोबत घेताना राज्य पातळीवरील कार्यकारिणी निर्णय घेते. मात्र राज ठाकरेंच्या अमराठी भूमिकेमुळे त्यांच्यासोबत युतीचा निर्णय घेताना तो केंद्रात घ्यावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आज तरी मनसेबाबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, असे पाटील यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community