मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

147

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अॅड. पुनम काशिनाथ गुंजाळ (वय 27) यांनी तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 354/अ, ड, 500,34 आयटी ऍक्ट क 66 c 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.

(हेही वाचा – राज ठाकरे पुण्यातूनच होणार औरंगाबादकडे रवाना)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत.

मनसेचे कार्यकर्ते करणार मोठे शक्तिप्रदर्शन

राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा सर्वाधिक चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सभेआधी उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई झाली आहे. तर राज्यातील अन्य पक्षांचे नेते सध्या हनुमान चालिसा पठणाचे विषय चघळत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मागणीचे पडसाद उमटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पुण्यात येणार आहे. यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळी ते औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यात शंभराहून अधिक चारचाकी गाड्या असतील. ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.