राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

135

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथील सभा होणार की नाही? असा पेच मनसैनिकांपुढे होता परंतु राज ठाकरेंच्या आदेशावरून मनसे पदाधिकारी, मनसैनिक यांनी सभेची जय्यत तयारी केली आहे . राज ठाकरे यांनी सभेची तारीख जाहीर केल्यापासून मनसैनिकांना सभेच्या परवानगीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला परवानगी मिळाली असली तरी काही अटी – शर्तींची मर्यादा आखून देण्यात आली आहे. अशातच राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा अपघात अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ झाला असून या अपघातात ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे आणि कलाकार अंकुश चौधरी यांच्या गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेसाठी आज राज ठाकरे यांचा ताफा पुण्यातून औरंगाबादकडे रवाना झाला होता. शनिवारी सकाळी १०० पुरोहितांच्या साक्षीने पूजापाठ करुन त्यांचा ताफा वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी थांबला होता. पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे पुणे औरंगाबाद रस्त्यावर हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्युत्तर सभेची जय्यत तयारी सुरू

औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील या सभेसाठी बंदोबस्ताचा प्लान तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रत्युत्तर सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .

राज ठाकरे या अटी-शर्तींचे पालन करणार?

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)

१ ) मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून कोणतेही विधान करू नये

२ ) सामाजिक सलोखा बिघडेल, असे कोणतेही वर्तन करण्यात येऊ नये

३ ) सभेपूर्वी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

४ ) लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

५ ) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यास परवानगी नाही

६ ) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

७ ) सभेदरम्यान कोणत्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

८ ) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

९ ) सभेला येणार्‍या लोकांनी अशा घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

१० ) वाहन पार्किंगचे नियम पाळावे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.