आता माझा पक्षाशी संबंध नाही, शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंना असं का सांगितलं?

135

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाची देशभर चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणा-या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण या सभेच्या आधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. पक्षीय कारभारात आपण फार लक्ष देणार नसून, आपला सगळा वेळ आता नातवासाठी असेल, असं मी राज यांना सांगितलं असल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचाः अभिनेत्री नसूनही अमृता फडणवीस झळकणार कान्सच्या रेड कार्पेटवर, ‘हे’ आहे कारण)

आता फक्त नातवाकडे लक्ष

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि स्नुषा मिताली ठाकरे यांना 5 एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर ठाकरे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या नातवाच्या जन्माच्या वेळची गोड आठवण शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितली. नातवाचा जन्म हा प्रत्येक आजी-आजोबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे. त्यामुळे आता माझा पक्षाशी वगैरे संबंध नाही, आता मी फक्त आपल्या नातवाकडे लक्ष देणार आहे, असं मी राज ठाकरे यांना सांगितल्याचं शर्मिला ठाकरे मुलाखतीत म्हणाल्या.

(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, एक महिना कठीण आहे, काळजी घ्या)

तो क्षण वेगळाच…

आपल्या घरात नातवंडं येणार त्या क्षणाची उत्सुकता काहीतरी वेगळीच असते, असंही शर्मिला ठाकरेंनी यावेळी सांगितलं. जेव्हा अमित ठाकरे यांना बाळ झाल्याचं आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आनंदाने जल्लोष केला. त्यावेळी शेवटी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला सांगितल्यावर आम्ही भानावर आल्याचे शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः इंटरनेट बंद करण्यात भारत जगात टॉपर, एका वर्षात इतक्या वेळा झाले इंटरनेट ब्लॉक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.