मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या विरोधात मुंब्य्रातील मौलविंनी शांततेचे आवाहन करून, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे दावे केले होते. मात्र, हे दावे मनसेने फोल ठरवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंगे लावण्यावर बंदी असतानाही मुंब्रामध्ये भल्या पहाटे सुरु असलेल्या अजानचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल करून मनसेने मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
व्हिडीओ व्हायरल करुन पोलिसांना कारवाईचे आवाहन
ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे सर्वोच्च न्यायालयाची अवहेलना केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार,सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत (भोंगे) लाऊडस्पीकरवर बंदी असताना, शनिवारी मुंब्रा भागात पहाटे ४ वाजून ५६ मिनिटाला मोठ्या आवाजात अजान पठण सुरु असल्याचे, व्हिडीओ काही जणांनी मनसेकडे पाठवले आहेत. तेव्हा हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच सोशल मिडीयातही हे व्हीडीओ व्हायरल करून पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे.
( हेही वाचा: नाटक नाटकच असतं हो, तीन तास एन्जाॅय करायचं आणि घरी जायचं; सुप्रिया सुळेंचा टोला )
हा उफराटा न्याय का ?
कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता मुंब्रा भागात भोंगे लागले आहेत.दोन दिवसापूर्वी मुंब्रात काही मौलवींनी पत्रकार परिषद घेऊन, शांततेचे आवाहन करीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल. असे सांगितले होते. मात्र तसे चित्र दिसत नसुन एकाला एक न्याय आणि या मंडळीना दुसरा न्याय का ? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community