भाजपाला हरवण्यासाठी प्रशांत किशोरांचा रामबाण उपाय, म्हणाले… 

210
भाजपाला हरवण्यासाठी तिसरी किंवा चौथी कोणतीही नवी आघाडी उभी केली तरी ते शक्य होणार नाही. भाजपला रोखण्यासाठी केवळ दुसरी आघाडी चमत्कार करू शकते. त्यासाठी दुसरी आघाडी बळकट करावी लागेल, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही

प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखती दिली. आपण पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीला, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या रुपात उभे करण्यासाठी मदत करत आहात? असा प्रश्न विचारला असता, प्रशांत किशोर म्हणाले, या देशात कुठलीही तिसरी अथवा चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकते, असे मला कधीही वाटत नाही. जर आपण भाजपला पहिली आघाडी मानत असू, तर तिचा पराभव करण्यासाठी दुसरी आघाडी असायला हवी. जर एखाद्या पक्षाची भाजपाचा पराभव करण्याची इच्छा असेल तर त्या पक्षाला दुसऱ्या आघाडीच्या रुपात बळकट होऊन समोर यावे लागेल तरच हे शक्य आहे. त्यासाठी काँग्रेस हाच दुसरा मोठा पक्ष आहे. मात्र आपण काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.