शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खूप भोळे होते म्हणून भाजपने त्यांना वेळोवेळी फसवले, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. त्यामुळेच मी भाजपशी धूर्तपणे वागतो, असे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते की, आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. माझे वडील भोळे होते, पण मी भोळा नाही. माझ्या वडिलांनीच माझ्या रक्तात हिंदुत्त्व भिनवले आहे. हिंदुत्वाच्या आडून तुम्ही तुमचे डाव साधत होतात. त्याकडे बाळासाहेब ठाकरे यांनी कानाडोळा केला, पण मी तसा कानाडोळा करणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निधीवाटपात आमच्यावर अन्याय केला जातो, असे म्हणत शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात निधी मिळण्यावरून आमदारांच्या तक्रारी होत्या. मात्र त्या तक्रारी सर्वपक्षीय आमदारांच्याच होत्या. कारण कोरोना संकटामुळे राज्याचे अर्थचक्र थांबले होते, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा राज ठाकरे एकमेव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार! मनसैनिकांची बॅनरबाजी)
उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचा नागोबा – नारायण राणे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी जे कमावले ते उद्धव ठाकरेंनी गमावले. उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय आहे? उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस.. ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:चा भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखे फार काही नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
Join Our WhatsApp Community