भायखळ्यातील जेजे रुग्णालयात महिला डॉक्टराला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली. शनिवारी बालचिकित्सा विभागातील महिला निवासी डॉक्टराला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली. महिला निवासी डॉक्टर ही रुग्णसेवा देत असताना तिला मारहाण कऱण्यात आली.
मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. महिला निवासी डॉक्टर हल्ल्याप्रकरणात मारहाण करणा-या नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
(हेही वाचा पंजाबमध्ये देशातील पहिल्या मुस्लिमबहुल मलेरकोटला जिल्ह्यात फडकला खलिस्तानी झेंडा)
राज्यातील सर्व वैद्यकीय सरकारी रुग्णालयांमधील सुरक्षेसंबंधी १६ मार्च रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत निवासी डॉक्टरांची बैठक झाली होती. वैद्यकीय रुग्णालयात सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल अपुरे पडत असल्याचा मुद्दा निवासी डॉक्टरांनी मांडला होता. मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सक्षम सुरक्षा यंत्रणेबाबत आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ते अंमलात आणले गेले नाही. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मार्ड संघटनेने डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची कल्पना देत डॉक्टरांच्या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून त्वरित हस्तक्षेप करत मार्ग काढा, अशी मागमी केली आहे.
Join Our WhatsApp Community