मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या 8 तास ड्युटीपाठोपाठ आता पोलीस अंमलदार आणि अधिका-यांच्या 8 तास ड्यूटीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांकडून हिरवा झेंडा मिळाल्यामुळे लवकरच 50 वर्षांखालील पोलिसांना 8 तास, तर 50 वर्षांपुढील पोलिसांसाठी 12/24 चा फाॅर्म्युला लागू करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचे आदेश निघणार असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.
अधिका-यांकडे विचारणा
संजय पांडे यांनी आयुक्तपदी आल्यानंतर, महिला पोलिसांच्या ड्यूटीचे तास 8 करणा-या निर्णयाची अंमलबजावणी केली होती. या पाठोपाठ आता आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील अंमलदार आणि अधिका-यांनाही 8 तास ड्युटी करण्याबाबतची मागणी वाढली. आयुक्तांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत अधिका-यांकडे विचारणाही केली होती.
( हेही वाचा: संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक एक भारतीय आहे )
साहेब आमच्या 8 तासांचे काय ?
महिलादिनी मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या 8 तास ड्युटीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सशस्त्र पोलीस दलातील महिलांना अद्याप 8 तास ड्युटीचा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा न्याय का? असा सवाल सशस्त्र दलातील महिला पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community