रायगड जिल्ह्यातील अंजिक्य किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे, त्या जंजीरा किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना होड्यांनी जावे लागते. यात पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. हे लक्षात घेऊन सागरमाला प्रकल्पांतर्गत राज्य सरकारने आता येथे एक सुसज्ज जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या जेट्टीवर 111 कोटी 41 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
लवकरच निघणार टेंडर
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पदभार घेतल्यापासून राज्यातील पर्यटनवृद्धीवर विशेष भर दिला जात आहे. त्यात कोकणातील सागरी आणि गडकोट किल्ल्यांच्या पर्यटनाकडे त्यांचे विशेष लक्ष असल्याने, जंजिरा किल्ल्यावर जेट्टी बांधकामासाठी 111 कोटी 41 रुपयांच्या भरीव निधीस तत्काळ मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता लवकरच पुरातत्व खाते आणि केंद्र शासनाच्या मान्यतेने जेट्टीच्या बांधकामाचे टेंडर काढण्यात येणार आहे.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या घोटाळ्याची लंका कधीही जळू शकते, सोमय्यांचा इशारा )
जेट्टी बांधण्यास मान्यता
या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने जावे लागत असल्याने, वृद्ध, महिला आणि लहान मुलांची मोठी कसरत होते. त्यामुळे होडीतून उतरताना या पर्यटकांचे अतोनात हाल होतात. यावेळी अपघात होण्याचीही भीती असते. यामुळे येथील पर्यटनवद्धीसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने येथे जेट्टी बांधण्याचे ठरवले होते. त्यामुळे आता जेट्टी बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community