भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक झाला आहे. अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांनी सोमवार, २ मे रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दूधसागर, गोरेगाव येथील राहत्या घरीच त्यांना देवाज्ञा झाली. शैलजा भातखळकर यांची अंत्ययात्रा गोरेगाव येथे काढण्यात येणार होती, त्यानंतर आरे येथील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
Join Our WhatsApp Community