संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी नाही! अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

118
तुमचे युतीचे सरकार १९९५ ते १९९९ काळात होते, तेव्हा तुम्हाला काम करता आले असते. लोकांच्या मनात जे विष कालवत आहेत त्यांनी दुसऱ्यांची एखादी संस्था उभी करण्यासाठी साधा शब्द टाकला नाही, साधी छोटी सोसायटी तयार केली नाही. एखादा कारखाना उभा केला आहे का? असा प्रश्न विचारत, संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवसृष्टीचे येवला शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्श केले. यावेळी त्यांना राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.

(हेही वाचा गिरणी कामगारांचा घरासाठी संघर्ष सुरूच!)

यांचे जेवढे वय आहे तेवढे शरद पवारांचे राजकीय काम 

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांनी अमुक केले तमुक केले असे सांगतात, त्यांनी मशिदींसह मंदिरावरील भोंगे बंद केले. महाराष्ट्रात करायचे असेल तर साई बाबांची काकड आरती ५ वाजता असते, रात्रीचा जागरण गोंधळ, हरिनाम सप्ताह रात्रीच असतो, ग्रामीण भागात जत्रा सुरु आहेत तिथे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीच होतात, त्यावर बंदी येईल, याचा कधी विचार केला आहे का, अशी विचारणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. शिवरायांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. शिवरायांचे शरद पवार केवळ नाव घेत नाही, तर त्यांच्या विचारांवर अंमलबजावणी करतात. भाषण म्हणजे काय नुसत्या नकला करतात, नकलाकार आहे का भाषण करतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्र्यांनी केला. गेल्या दोन तीन सभांमधून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना जातीयवादी म्हटले. राज ठाकरे यांच्या या टिकेला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिले. शरद पवार फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत, तर त्यांच्या विचारांवर चालण्याचे काम करतात. आमच्या रक्तात आणि नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. फक्त शिवरायांचे नाव घेऊन आपले दुकान चालवणाऱ्यांना महाराज समजलेच नाहीत. यांचे जेवढे वय आहे तेवढे शरद पवारांचे राजकीय काम आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.