मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वाॅरंट जारी करण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी हे वाॅरंट राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आले होते. सांगली येथील शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंवर वाॅरंट जारी करुनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल पोलिसांना केला आहे. 28 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आलेले हे पत्र आता समोर आले आहे.
जामीन मिळणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंवर 143, 109, 117 अशी कलमे लावण्यात आली आहेत. 2008 सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात हे वाॅरंट जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे वाॅरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या वाॅरंटेमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. शिराळ्यातील न्यायदंडाधिका-यांनी हे वाॅरंट जारी केले आहे.
( हेही वाचा: लढायचे असेल, तर समोरुन लढा अशा सुपा-या काय देता? राऊतांचा भाजपाला टोला )
…म्हणून अजामीनपात्र वाॅरंट जारी
राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, शिराळा न्यायालयाने जुन्या प्रकरणात वाॅरंट जारी केला आहे. याआधीही राज ठाकरेंविरोधात वाॅरंट जारी करण्यात आले आहेत. तेव्हा ते चौकशीला हजर राहिले नाहीत. जामीन देऊनही राज ठाकरे चौकशीला हजर न राहिल्याने, अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community