गिरणी कामगारांच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या घरांची किंमत सहा लाख रुपये असून, यात पाच टक्क्यांनी म्हणजे सुमारे 30 हजार रुपये वाढ करण्याची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.
लवकरच घरांची सोडत
हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून म्हाडाकडून लवकरच एमएमआरडीएच्या 2 हजार 521 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. घरांची किंमत निश्चित करण्यासाठी आता एमएमआरडीएकडून नगरविकास विभागाकडे विचारणा करण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयानंतरच म्हाडाकडून सोडतीचा मुहूर्त काढण्यात येणार आहे.
( हेही वाचा: लढायचे असेल, तर समोरुन लढा अशा सुपा-या काय देता? राऊतांचा भाजपाला टोला )
काय होणार निर्णय
प्रस्तावानुसार, एमएमआरडीएने सध्याच्या घरांच्या किमतीत पाच टक्के वाढवून मागितल्या आहेत. म्हणजेच 30 हजार रुपयांनी किमती वाढवून त्या 6 लाख 30 हजार रुपये अशा करण्याची मागणी आहे. आता नगरविकास विभाग याबाबत काय निर्णय घेते यावर कामगारांना आगामी सोडतीतील घरे 6 लाखात की 6 लाख 30 हजार रुपयांत मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Join Our WhatsApp Community