औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचे सहकारी नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील वसंत मोरे हे सर्वाधिक चर्चेत आहेत. ते सध्या गायब आहेत.
वसंत मोरे गायब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली. त्याला मनसेचे पुणे येथील अध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध केला होता. तेव्हापासून वसंत मोरे चर्चेत आले. पुढे राज ठाकरे यांनी ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेतल्या. त्यावेळी वसंत मोरे यांची चर्चा सुरु होती. औरंगाबाद सभेनंतर राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याबरोबर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांवरही प्रतिबंधात्मक नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार वसंत मोरे हे देखील गायब झाले आहेत. माध्यमेही वसंत मोरे यांचा शोध घेत आहेत. परंतु वसंत मोरे हे सध्या गायब आहेत. मोरे हे तिरुपती बालाजी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत, अशी माहिती आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?)
Join Our WhatsApp Community