औरंगाबाद येथील सभेमधील भाषणामुळे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या भाषणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये राज ठाकरे आणि इतर अर्थात आयोजक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये राज ठाकरे हे आरोपी क्रमांक १ आहेत.
सभेचे आयोजक जावळीकर यांच्याविरोधात गुन्हा
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे ठरवल्यावर पोलिसांनी तातडीने राज ठाकरे त्यांच्या या सभेच्या आधी १६ अटी घातल्या होत्या. ही सभा झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अहवाल दिला. त्यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गंभीर गन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहेत. त्यात राज ठाकरे हे आरोपी क्रमांक १ आहेत. त्याखाली सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ४५ मिनिटे भाषण केले. त्यात शेवटच्या ५ मिनिटांत राज ठाकरे यांनी जी वक्तव्ये केली, त्याआधारे त्यांच्यावर कलम १५३ अ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या घरी पोलीस दाखल होणार)
Join Our WhatsApp Community