मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर बुधवारी राज्यात अनेक मशिदींवर भोंग्यांवरुन अज़ान वाजली नाही. त्याच संदर्भात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मौलवींचे आभार मानले. त्यावेळी राज ठाकरे यांना पत्रकारांनी हिंदीत बोलायची विनंती केल्यानंतर राज ठाकरेंच्या हिंदीवरुन जोरदार हशा पिकला.
(हेही वाचाः ‘या’ मशिदींवर कारवाई कधी होणार? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी)
काय झाले नेमके?
मराठीतून पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे यांना हिंदी पत्रकारांनी हिंदीतून बोलण्याची विनंती केली. त्यावेळी, माझं हिंदी चांगलं नाही एवढं, असं राज ठाकरे म्हणाले. पण पत्रकारांनी पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदीत मजेशीर विधान केले. हमारे कार्यकर्ता धरपकड्या जो चल रहा है, असं राज ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर राज ठाकरे देखील हसले आणि त्यानंतर त्यांनी अस्खलित हिंदीत बोलायला सुरुवात केली.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या अटकेचा मनसेला ‘असा’ झाला होता फायदा)
त्यांच्यावर कारवाई कधी?
बुधवारी महाराष्ट्रात 90-92 टक्के ठिकाणी सकाळची अज़ान झाली नाही. त्या सर्व मशिदींमधील मौलवींचे मी आभार मानतो. माझा विषय त्यांना नीट समजला. मुंबईच्या रिपोर्टनुसार, मुंबईत एकूण 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळी 5च्या आत अज़ान सुरू झाली. मंगळवारी मला पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता. सर्व मशिदींवर सकाळची अज़ान लागणार नाही, असे त्यांच्याकडून मला सांगण्यात आले. मग ज्या 135 मशिदींवर पहाटे 5 च्या आत अज़ान झाली, त्यांच्यावर राज्य सरकार आता कुठली कारवाई करणार आहेत की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना उचलणार आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ, भोंग्यांबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब?)
Join Our WhatsApp Community