माझी पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्यात साम्य! देवेंद्र फडणवीसांचे मार्मिक विधान 

169

उद्धव ठाकरे टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी अमृता नको त्या गोष्टींवर बोलणे सोडत नाही, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस यांच्यामध्ये हे एक साम्य आहे, असे मिश्किल वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री-अमृता फडणवीसांमध्ये रंगले वाकयुद्ध  

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगले गातात असे मला आदित्यने सांगितले होते. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असे मला वाटत होते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. त्यावर अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. ‘मला वाटले होते, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळले आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे, असे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वाकयुद्धात देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे मार्मिक उत्तर दिले.

(हेही वाचा आजचा दिवस हिंदूंसाठी काळा दिवस! संजय राऊतांची मनसेवर टीका)

फडणवीसांचा सल्ला 

खरे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी आपली पातळी उच्च ठेवली पाहिजे आणि ज्यावेळी मुख्यमंत्री एखादे वक्तव्य करतील, त्यावेळी अमृता फडणवीस यांनीही त्यांना उत्तर देता कामा नये. त्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे, अर्थात काय बोलायचे काय नको, हा त्या दोघांचा प्रश्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.