अलिकडे सोलो ट्रॅव्हल करण्याचा ट्रेंड सुरू आहे. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे, नव्या लोकांना भेटणे, प्रचलित नसलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी सोलो ट्रॅव्हेलिंग (Solo Travelling) करण्यास अनेक लोक प्राधान्य देतात. तुमच्या सोलो ट्रिपला अविस्मरणीय बनवण्यासाठी काही गोष्टींची तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी जाणून घेऊया…
( हेही वाचा : समुद्रकिनारी गेल्यावर या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद नक्की घ्या… )
पर्यटनस्थळाची माहिती घ्या
सोलो ट्रिपला जाण्यापूर्वी तुम्ही संबंधित जागेची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. तुमच्या ओळखीची व्यक्ती आधी त्या जागेवर फिरून आली असेल तर संबंधित ठिकाणची विस्तृत माहिती मिळवा. दुसरा पर्याय म्हणजे गुगलवर सर्च करून पर्यटनस्थळाची माहिती घ्या.
हॉटेल किंवा होमस्टेचे आगाऊ बुकिंग
सोलो ट्रिपला जाताना राहण्याच्या व्यवस्थेची आगाऊ बुकिंग करा. अनेकवेळा ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्षस्थळी जाऊन हॉटेल्स बुक केल्याने पैशांची बचत होते, परंतु सीझनला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे येण्या-जाण्याचे तिकिट, हॉटेल किंवा होमस्टेचे आगाऊ बुकिंग करणे आवश्यक असते. सोलो ट्रिपला गेल्यावर तुम्ही लोकल हॉस्टेलमध्ये सुद्धा राहू शकता याकरत zostel, hotellers यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत.
कागदपत्रे सोबत ठेवा
सोलो ट्रिपला जाण्याआधी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. अनोळख्या जागी तुम्हाला कधीही कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते.
काळजीपूर्वक बॅगपॅक करा
सोलो ट्रिपमध्ये तुम्हाला तुमच्या जबाबदारीसह तुमची स्वतःची बॅग न्यावी लागते, त्यामुळे काळजीपूर्वक सामान भरा.
महिला सोलो ट्रॅव्हलर्ससाठी
सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांनी संपूर्ण ट्रिप आधीच प्लॅन करून विश्वासू व्यक्तींना आपले लोकेशन, हॉटेल स्टे, कुठे फिरणार, यासंदर्भात माहिती द्यावी.
Join Our WhatsApp Community