गुजरात सागरी हद्दीत सापडली पाकिस्तानी बोट

147
गुजरात भुज येथे भारताच्या सागरी हद्दीत घुसलेली पाकिस्तानची बोट ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी बीएसएफ शोध घेत आहे. ही पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत सुमारे 100 मीटर आत दिसली. या बोटीत आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. ही एक पारंपरिक बोट आहे, जी मासेमारीसाठी वापरली जाते, असे बीएसएफने म्हटले आहे.
विशेष म्हणजे ही बोट इंजिनशिवाय आहे. बीएसएफ भुजचे पथक अरबी समुद्राजवळ गस्त घालत होती. त्यावेळी बीपी क्रमांक 1158 हरामी नाला परिसरात काही संशयास्पद गोष्टी घडण्याची शक्यता होती. त्यानंतर पाकिस्तानी मच्छीमार तीन-चार बोटीतून भारतीय पाण्यातून खोलवर येत असल्याचे दिसले. यानंतर बीएसएफ पथक जात असताना पाकिस्तानी मच्छिमार परिसरातील झुडपांच्या मदतीने लपून पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले. बीएसएफच्या पथकाने एक बोट ताब्यात घेतली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.