विस्तारासाठी महत्वाकांक्षी बनलेल्या चीनने आता तैवानला गिळण्याचा प्लॅन तयार केला आहे. यासाठी चीनने तैवानच्या आर्थिक आणि बौद्धिक क्षमता नियंत्रणात घेण्यासाठी विविध योजना आखत आहे. संवादाच्या माध्यमातून तैवानला मुख्य भूमीशी जोडू, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अशा गोड शब्दांत स्वतःचा मनसुबा बोलून दाखवला.
तैवानच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार
चिनी कंपन्या तैवानच्या अभियंत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तैवानमधील सेमीकंडक्टर अभियंत्यांना आणि एक्झिक्युटिव्हसना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याकरता कंपन्या त्यांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवत आहेत. पगार अधिक मिळत असल्याने तैवानमधील काही अभियंते इच्छा नसतानाही चिनी कंपन्यांसाठी काम करत आहेत. यामुळे तैवानचे अभियंते चिनी कंपन्यांकडे गेल्यास त्यांच्यासोबत काही व्यापारी गुपितंदेखील चीनकडे जातील, अशी भीती तैवानला वाटत आहे. याचा फटका तैवानच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो.
(हेही वाचा भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पवारांचा दावा ठरला खोटा! पोलिसांकडून संभाजी भिडेंना क्लीन चिट)
Join Our WhatsApp Community