मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या आगामी अयोध्या दौ-याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पण आता याच त्यांच्या दौ-यावरुन भाजपच्या खासदाराने त्यांना गंभीर इशारा दिला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार बृजभूषण सिंह यांनी केले आहे.
(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, तर तृतीयपंथीही मुख्यमंत्री होईल)
भाजप खासदाराचा इशारा
5 जून रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर उत्तर भारतीयांविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडले होते. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मनात राज ठाकरे यांच्याबाबत नाराजी आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येची सीमा ओलांडू देणार नाही. तसेच जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
जब तक राज ठाकरे सार्वजनिक रूप से उत्तर भारतीयों से माफ़ी नहीं मांग लेते
मेरा आग्रह है तब तक मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी को राज ठाकरे से नहीं मिलना चाहिए @CMOfficeUP @BJP4UP @BJP4India @BJP4Maharashtra— BrijBhushan Sharan Singh (@b_bhushansharan) May 5, 2022
(हेही वाचाः महापालिका निवडणुका मविआ एकत्र लढवणार? पवार म्हणतात…)
दौरा होणारच
बृजभूषण सिंग यांची प्रतिक्रिया ही वैयक्तिक असून, त्यांच्या या राजकीय भूमिकेचा आम्ही आदर करतो. पण राज ठाकरे यांचा हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे या छोट्या मोठ्या अडणचणींवर आम्ही मात करू. राज ठाकरे यांचा दौरा हा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community