मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेमुळे बराच वाद निर्माण झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाचा पोलिसांनी आढावा घेतला आहे. त्याचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भातील अहवाल तयार झाला आहे. आता त्यानुसार राज ठाकरे यांच्यावर कारवाई काय करायची, यावर आता विचारविनिमय सुरू झाला आहे.
राज ठाकरेंकडून १२ अटींचे उल्लंघन
राज ठाकरे यांच्या सभेसाठी १६ अटी लावल्या होत्या. त्यातील १२ अटींचे उल्लंघन करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पोलिसांनी यासंबंधी पुरावे गोळा केले आहेत. लवकरच साक्षीदारांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे. भाषणातून राज ठाकरे यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सभा स्थळाचा पंचनामा केला आहे. सभेच्या भाषणाचे पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. राज ठाकरे यांना या प्रकरणी लगेच नोटीस द्यायची का, नंतर द्यायची हा तपासी अधिकाऱ्याचा तपासावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा इतिहास संशोधक डॉ. संपत यांची बदनामी करणारे ट्विट काढून टाका! दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश)
Join Our WhatsApp Community