महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत चिथावणीखोर भाषण केले. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे जनहित याचिका इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर.एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्याविरोधात कलम 153 दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याची तसेच मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेतून राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्याविरोधात कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर भाषण देणे), कलम 116 (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि 117 (10 हून अधिक लोकांनी केलेल्या गुन्ह्यास उत्तेजन देणे) या कलमांखाली भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हांची नोंद केली आहे. दरम्यान ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणाच्या वक्तव्याने समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणार्या, प्रक्षोभक भाषणे करणार्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तुर्तास बंदी घालण्याची मागणीही याचिकेत केली गेली आहे. या शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)
Join Our WhatsApp Community