भाजप नेत्यांवर आरोप करताना संजय राऊत यांच्या तलवारीला चांगलीच धार चढते. राज्यातीलच नाही तर केंद्रातील दिग्गज भाजप नेत्यांवर सुद्धा राऊत कायम टीका करत असतात. अशीच एक टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पण ही टीका करताना त्यांनी पार औरंगजेबाच्या जन्माच्या वेळचा इतिहास सांगितला.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाल्याचे सांगत त्यांनी मोदींवर टीका केली. पण औरंगजेबाच्या जन्मावेळी गुजरात राज्य अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे राऊतांचा इतिहास कच्चा असल्याची प्रतिक्रिया आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)
काय आहे खरा इतिहास?
राऊतांनी सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाचा जन्म 1618 साली दोहाडमध्ये झाला हे जरी खरं असलं, तरी त्यावेळी गुजरात हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं नव्हतं. 1 मे 1960 ला बॉम्बे प्रांतातून गुजरात राज्य नव्यानं स्थापन झालं. त्यामुळे राऊतांचा इतिहास कच्चा असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या सर्व नेत्यांना आता इतिहास शिकवण्याची गरज असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)
काय म्हणाले राऊत?
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची फार आठवण येत आहे. अनेक भाषणांतून ते औरंगजेबाचे दाखले देताना दिसत आहेत. औरंगजेब क्रूर होता, अत्याचारी होता, असं ते म्हणत आहेत. पण इतिहास आम्हाला नका शिकवू, औरंगजेबाला गाडणारा महाराष्ट्रच आहे. पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दोहाडमध्ये झाला हे सांगायला मोदी का विसरत आहेत? त्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा या महाराष्ट्रानं झुंजत ठेवलं आणि याच महाराष्ट्रात त्याची खबर खोदण्यात आली. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुमच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, हे लपवू नका, अशी टीका राऊतांनी मोदींवर केली आहे.
Join Our WhatsApp Community