औरंगाबाद येथील भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)
न्यायालयाचा नकार
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून, सुनावणीची तारीख लवकरच देण्यात येईल असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंचा ‘वसंता’ म्हणाला, “मी नाराज नाही तर…”)
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात राज ठाकरे यांचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 116, 117,153(अ) आणि महाराष्ट्र पोलिस कायदा अधिनियम 135 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकारी गजानन फकीरराव इंगळे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community