काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे शुक्रवारी शिवतीर्थावर बारसे झाले. ठाकरे कुटुंबात आगमन झालेल्या नव्या पाहुण्याचे नामकरण किआन ठाकरे असे करण्यात आले आहे. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले होते. नव्या पाहु्ण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत दिली होती.
अमित ठाकरेंनी शेअर केला पहिला फोटो
काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिली फोटो फेसबुकवर शेअर केला होता. अमित- मिताला यांना पूत्ररत्न झाले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आजोबा ही नवी जबाबदारी सांभाळत आहेत. मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे. मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे.
( हेही वाचा: रेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली )
2019 साली अडकले होते लग्नबंधनात
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले. त्यांच्या भव्य लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, जेष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बाॅलिवूड- मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community