७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून भारतासाठी एकामागून एक आनंदाच्या बातम्या येत आहेत. यावर्षी होणाऱ्या या फिल्म मार्केटमध्ये भारताची ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. कान्समध्ये अशी परंपरा प्रथमच सुरू झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताची ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे.
यावर्षी कान्स फेस्टीवल 17 मे ते 28 मे 2022 या कालावधीत होणार आहे. आपल्या देशाचा सन्मान या महोत्सवात पहिल्यांदाच होत आहे. या वर्षीपासून सुरू झालेली ही नवी परंपरा या चित्रपट महोत्सवाच्या पुढील आवृत्तीतही कायम ठेवली जाणार आहे.
French actor Vincent Lindon is the Jury President of the 75th Festival de Cannes! Along with his eight jury members, he will reward one of the 21 films in Competition with the Palme d'or, on Saturday May 28, during the Closing Ceremony. #Cannes2022
► https://t.co/8CTJtGOIQ6 pic.twitter.com/U6bdPGq1Xy— Festival de Cannes (@Festival_Cannes) April 26, 2022
हा चित्रपट महोत्सव भारतासाठी महत्त्वाचा
यावर्षी होणारा हा चित्रपट महोत्सव भारतासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एकीकडे भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे, कान्स महोत्सवही यंदा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 18 मे 2022 रोजी मॅजेस्टिक बीचवर जेरोम पेलार्ड आणि गुइलॉम इस्मिओल या कार्यकारी संचालकांच्या परिचयाने आणि भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या स्वागतपर भाषणाने चित्रपट महोत्सवाचा उत्सव सुरू होणार आहे.
( हेही वाचा :उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही )
भारताची कान्सकडे वाटचाल
या वर्षी या चित्रपट महोत्सवात भारत ठळकपणे दिसणार आहे. यावर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य फीचर फिल्म स्पर्धेत ज्युरी म्हणून दिसणार आहे. या ज्युरीचे अध्यक्ष फ्रेंच अभिनेते विसेंट लिंडन आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलने दीपिका पदुकोणची ओळख करून देताना सांगितले की, दीपिकाने 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सहभागी होते. दीपिकाने 2017 मध्ये पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवले होते.
Join Our WhatsApp Community