स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०२२ या दिवशी सहावी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, पुणे, नगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरण्यात आली. चारही केंद्रांवर मिळून ४० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सर्वात जास्त वयाचे गिरीश भागवत, ८२ वर्षे हे सहभागी झाले होते.
काही स्पर्धकांनी सलग सहाव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला
या स्पर्धेत कोल्हापूर येथे वयाची सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ जनही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यंदा चारही शहरांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केद्रांवरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केंद्रावर मिश्र वयोगट होते. काही स्पर्धकांनी सलग सहाव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. जळगाव, दापोली, अंबरनाथ अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले तर विदर्भातून काही स्पर्धक पुणे केंद्रावर पोहोचले होते.
(हेही वाचा बहुसदस्यीय प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)
अधिक शहरांचा समावेश
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहरांचा समावेश यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे अध्यक्ष राजेश खिलारी, पुणे केंद्राचे प्रमुख परेश जोशी, नगर केंद्र प्रमुख संतोष यादव आणि कोल्हापूर केंद्र प्रमुख नवीनकुमार माळी, तसेच जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे कार्यकर्ते विलास कडू, नेहा खवळे यांचे त्यांनी कौतुक केले.
Join Our WhatsApp Community