विनापरवाना ऑनलाइन खरेदीच्या माध्यामातून गर्भपाताच्या गोळ्या विकण्याचा प्रकार ॲमेझॉन पाठोपाठ मिशो या ऑनलाइन एप्लिकेशनलाही महाग पडला आहे. मिशोविरोधात अन्न व औषध प्रशासनाने थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध भागांतून मिशोवर तब्बल १३ गुन्हे (एफआयआर) दाखल केले आहेत.
( हेही वाचा : येत्या रविवारी होणार प्रवाशांचा खोळंबा! या मार्गांवर असणार मेगाब्लॉक )
मिशोवर ऑनलाइन गर्भपाताच्या गोळ्या मिळत असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनीच पडताळणी करण्याचे ठरवले. या अधिका-यांनी ऑनलाइन गर्भपाताच्या गोळ्या मागवल्या असता मिशो एप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या. या ऑनलाइन ऑर्डरमधून मुंबईत ९ वेळा गर्भपाताच्या गोळ्या उपलब्ध झाल्या. ठाण्यात तीन वेळा ऑनलाइन ऑर्डर मिशोकडून स्विकारली गेली. कोल्हापूर, जळगाव, नागपूर आणि औरंगाबाद येथूनही एक ऑर्डर मिशोने स्विकारली होती. ही औषधे राज्यातील इतर भागांतून राज्यात मिशोने पुरवली. आग्रा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून या ऑर्डर्स स्किकारल्या गेल्या. तपासाअंती मनकाईण्ड फार्मा आणि डॉ. मॉरपॅन या कंपन्यांकडून गर्भपाताच्या गोळ्या मिशो एप्लिकेशनवर उपलब्ध होत होत्या.
गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन हे धोकादायक असते. प्रत्येक महिलेला डॉक्टरांच्या संमतीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाणे जिवासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्या सर्रास विकण्यास अन्न व औषध प्रशासनाकडून मनाई केली जाते. डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच वैद्यकीय क्लिनिकमधून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात.
१३ एफआयआर दाखल
मिशो तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील विक्रेत्याविरोधात मुंबईत ६ ठिकाणी, ठाण्यात ३ ठिकाणी, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नागपूरात प्रत्येकी एका ठिकाणी असे मिळून १३ एफआयआर अन्न व औषध प्रशासनाने दाखल केले आहेत.
Join Our WhatsApp Community