मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
( हेही वाचा : दहावी पास आहात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ३०२६ पदांची भरती )
कोकणात प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्ग
परंतु ऐन उन्हाळाच्या सुट्ट्यांमध्ये परशुराम घाट बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत त्यामुळे कोकणात गाडीने जायचे असेल तर पर्यायी मार्ग कोणता याविषयी जाणून घेऊया…
वाहतूक बंद असणाऱ्या वेळेत कमी वजनाच्या गाड्या/वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता, कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
परशुराम घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल या मार्गावर याबाबतचे फलक लावून माहिती दिलेली आहे.
घाटातील रुंदीकरणाच्या कामाला गती देऊन पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारण्यासाठी ही वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.
Join Our WhatsApp Community