अमरावतीच्या खासदार नववीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. 12 दिवसांच्या कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मंजीर करताना न्यायालयाने 3 महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या. त्यात माध्यमांशी न बोलण्याची अट घालण्यात आली होती. परंतु नवनीत राणा यांनी माध्यामांशी संवाद साधला आणि शिवसेनेवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. यानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लघंन केल्याचा आरोप केला. आता मुंबई पोलिस राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची तपासणी करणार आणि त्यात जर काही आक्षेपार्ह आढळले, तर मात्र राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येऊ शकते.
राणा दाम्पत्याला घालण्यात आल्या होत्या या अटी
- राणा दाम्पत्य जामीनावर असताना, त्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव असेल. माध्यमांशी बोलल्यास जामीन अर्ज रद्द होणार
- 50 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. याची हमी देताना फसवणूक झाल्यासही जामीन रद्द होऊ शकतो.
- तपासादरम्यान, पुराव्यांशी छेडछाड केली किंवा तपास प्रभावित होईल, असे कृत्य केले. तरीदेखील पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागू शकते.