पूर्व उपनगरांमधील ‘कुर्ला पश्चिम’ येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर साकीनाका येथे एक्सप्रेस इन् हॉटेलच्या समोर झडपा बसवण्याचे काम येत्या मंगळवारी १० मे २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ११ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तर काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या जल अभियंत्याने कळवले.
या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.
या भागांना बसणार पाणी कपातीचा फटका
– जरीमरी, शांती नगर, तानाजी नगर, श्री कृष्णा नगर, सत्या नगर पाईप लाईन मार्ग, वृन्दावन खाडी नंबर ३, आशा कृष्णा इमारत, अन्नासागर इमारत, तिलक नगर, साईबाबा कंपाऊंड, डी सिल्वा बाग, एल. बी. एस. नगर, शेठीया नगर, सोनानी नगर, महात्मा फुले नगर, बरेली मस्जिद परिसर, शिवाजी नगर, अंधेरी कुर्ला मार्ग, अनिस कंपाऊंड, अंबिका नगर, सफेद पूल, उदय नगर – *(सकाळी ६.०० ते दुपारी १.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक १० मे २०२२ रोजी पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते सकाळी १०.०० या वेळेत होईल आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दिनांक ११ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.).*
( हेही वाचा: आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा; शिवसेनेची तारीख ठरली )
‘कुर्ला दक्षिण’ विभाग: – काजूपाडा, बैल बाजार, नवपाडा, एल. बी. एस. मार्ग, सुंदरबाग, ख्रिश्चन गांव, न्यू मिल मार्ग, हलाव पूल, मसरानी गल्ली, ब्राह्मण वाडी इत्यादी – (सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक १० मे २०२२ आणि दिनांक ११ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.)
Join Our WhatsApp Community