योगी सरकारचा निर्णय, अयोध्येत चौकाला देणार लता मंगेशकरांचं नाव

118

भगवान श्री रामाची नगरी असलेली अयोध्याची पून्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा कुठल्या राजकीय हालचालींवरून नाही तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्यामुळे ही चर्चा आहे. लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारीला निधन झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयानुसार, अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कोणत्या चौकाला हे नाव द्यायचे, याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला योगी आदित्यनाथ यांनी १५ दिवसांचा वेळ दिला असून त्यासंदर्भात प्रस्ताव सादर निर्देश दिले आहेत.

योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी यासंदर्भात मोठी घोषणा केली होती. इतकेच नाही तर लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असेही ते म्हणाले होते. या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली होती. जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी पर्यटक, भाविक येतील येतील, तेव्हा या निमित्ताने लता मंगेशकर यांच्या गाण्यांचेही त्यांना स्मरण होईल.

(हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा!)

दरम्यान शुक्रवारी ६ मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा अयोध्येत भगवान रामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराची पाहणी करून अयोध्येच्या विकास कामांबाबत त्यांनी अढावा घेतला. अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तर अयोध्येत भगवान श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक लता मंगेशकर यांचे नाव असलेल्या चौकातून हनुमान गढी व राम जन्मभूमीच्या दिशेने जातील, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.