100 कोटींच्या वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत आले. देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह. पण त्यांच्यावर झालेले आरोप हे खोटे असून, ते लवकरच बाहेर येतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
रोहित पवार हे सध्या नागपूरच्या काटोल मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. विविधा विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या दौ-यावेळी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचाः जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री पाणी घेऊन धावल्या तेव्हा… पहा व्हिडिओ)
काय म्हणाले रोहित पवार?
या मतदारसंघात काम खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत. अनिल देशमुख यांच्या माध्यमातून याठिकाणची अनेक विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे इथल्या जनतेच्या मनात देशमुख यांच्याबाबत आदराची भावना आहे. आमच्या आमदारावर राजकीय हेतूने आरोप करण्यात आल्याची भावना इथल्या जनतेच्या मनात आहे. देशमुखांवरील आरोपांचा आकडा आता हळूहळू कमी होत आहे. 100 कोटींवरुन 4.5 कोटी, त्यानंतर 1.5 कोटी असे आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हा आकडा शून्य कोटीवर येईल आणि अनिल देशमुख बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
देशमुखांच्या अडचणी वाढल्या
विशेष सीबीआय न्यायालयाकडून देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयाने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवली असून, देशमुख यांच्या न्यायालयान कोठडीत 13 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढत असल्याचे बोलण्यात येत आहे.
(हेही वाचाः उद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा)
Join Our WhatsApp Community