श्रीलंकेत पराकोटीची आर्थिक कोंडी झाली आहे. कारण याठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे. महागाई प्रचंड महागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर हिंसाचार करत आहेत. अखेर श्रीलंकेत सत्तांतर झाले आहे. त्यानंतर प्रचंड हिंसाचार झाला, त्यामध्ये एका खासदाराचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या राजदूतांनी या हिंसाचाराचा निषेध
श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारामुळे आणि प्रचंड महागाई वाढल्याने श्रीलंकेत अखेर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मात्र श्रीलंकेत हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. या हिंसाचारामध्ये आता सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा प्रकारे श्रीलंकेचा प्रवास यादवीकडे सुरु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरकीर्ती अथूकोरला असे मृत्यू झालेल्या खासदाराचे नाव आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी काहीच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हिंसाचारास सुरुवात झाली. या हिंसाचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाला आहे, तसेच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 139 जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील अमेरिकेच्या राजदूतांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर सत्ताधारी पक्षाने हल्ला केल्याची घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा अनिल परबांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी! रत्नागिरीत शिवसेना पदाधिकारी संतापले)
Join Our WhatsApp Community