भाजपचे बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौ-याला विरोध केला आहे. अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, कोणाला कितीही टोकाची भूमिका घेऊ द्या. टोकाची भूमिका आम्हालाही घेता येता. आम्ही अयोध्येला जाणारच. राज ठाकरे यांनी दौ-याची घोषणा आधीच केली आहे. आमची तयारीही सुरु आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येला जाणारच, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधाला राज ठाकरेच उत्तर देतील
राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मंगळवारी सर्व प्रवक्ते आणि नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले की, गेल्या काही दिवसात आमच्या तीन सभा झाल्या. राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. अयोध्या दौ-यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुन्हा एकदा बैठक होणार आहे. बृजभूषण सिंह यांनी केलेल्या विरोधावर राज ठाकरेच बोलतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
( हेही वाचा: देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण भाजपमुळे खड्डयात गेले; भुजबळांचा घणाघात )
तो भाजपचा प्रश्न
भाजप बृजभूषण सिंह यांना समज का देत नाही? असा सवाल केल्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, तो भाजपाचा प्रश्न आहे. आम्ही हिंदुत्व, भोंगे आणि हनुमान चालिसाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता सर्व जागे झाले आहेत. हनुमान चालिसा म्हणत आहेत. भगवा झेंडा घेऊन जात आहेत. नाना पटोले आणि आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. काही लोक मंदिरात जात आहेत, तर काही हनुमान चालिसा म्हणत आहेत, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community