एसी डबे ट्रेनच्या मध्यभागीच का असतात? ‘हे’ आहे कारण…

150

गावी जाताना किंवा फिरायला जाताना आपण ट्रेनने प्रवास करतो. रेल्वे प्रवास करताना तुम्हालाही लक्षात आले असेल की, एसी डबे नेहमी रेल्वेच्या मध्यभागी असतात. दुरांतो, वंदे भारत, राजधानी या रेल्वे गाड्या वगळल्या तर इतर मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती जनरल डबे, स्लीपर क्लास, एसी डबे आणि शेवटी पुन्हा जनरल डबे यासारखीच असते. रेल्वे डब्यांची अशी रचना का करण्यात आली, एसी डबे मध्यभागी का असतात असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतो. एसी डबे कायम मध्यभागी का असतात याविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : या मार्गावरील एसी लोकल बंद होणार? )

एसी डबे मध्यभागी का असतात?

प्रत्येक भारतीय रेल्वेमध्ये वरच्या श्रेणीचे डबे आणि महिलांसाठी राखीव डबा रेल्वेच्या मध्यभागी ठेवले जातात तर इतर डबे ट्रेनच्या दोन्ही बाजूस असतात असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या सोयीसाठी अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांवर एक्झिट गेट मध्यभागी असते, त्यामुळे एसी कोचमधून प्रवास करणारे नागरिक अगदी सहजपणे स्थानकांमध्ये प्रवेश करू शकतात किंवा बाहेर पडू शकतात. तर इतर डबे इंजिनाच्या किंवा गार्डच्या डब्याजवळ असतात. यामुळे लोकांची गर्दी संपूर्ण स्टेशनवर विभागली जाते. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रेल्वे डब्यांची अशाप्रकारे रचना केलेली असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.