शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. राज ठाकरे यांच्या दौ-यानंतर लगेचच हा दौरा होणार असल्यामुळे सगळ्यांचे या दौ-याकडे लक्ष लागले आहे. याच दौ-याबाबत आता आदित्य ठाकरे यांनी विधान केलं आहे. महाराष्ट्रातलं रामराज्य देशात आणण्यासाठी आपण अयोध्येला जाणार असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः कोणाला कितीही विरोध करु द्या आम्ही अयोध्येत जाणारच; मनसे ठाम)
महाराष्ट्रातलं काम देशात करू इच्छितो
मी विरोधकांवर सहसा बोलत नाही, जे संपलेले विषय आहेत त्यावर देखील बोलत नाही. अयोध्येत आम्ही शिवसेना म्हणून जाणार आहोत. जेव्हा राम मंदिरासाठी संघर्ष सुरू होता, तेव्हापासून शिवसेनेने अयोध्येला अनेकदा भेट दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अखेर राम मंदिर निर्माणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता संघर्ष संपला आहे. जे काम आम्ही महाराष्ट्रात करत आहोत ते देशात करू इच्छितो, त्या रामराज्यासाठी आम्ही आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः योगी सरकारचे कार्यालय मुंबईत उघडणार! ‘हा’ असणार मुख्य उद्देश)
प्रशासनाने हटवले बॅनर
आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा 10 जून रोजी होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. असली आ रहे है, नकली से सावधान’,अशी बॅनरबाजी देखील शिनेकडून अयोध्येत करण्यात आली होती. पण आता हेच बॅनर अयोध्या प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. अयोध्येतील नया घाट परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील शिवसैनिक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः अयोध्येतील आदित्य ठाकरेंच्या दौ-याचे बॅनर हटवले, शिवसैनिकांमध्ये नाराजी)
Join Our WhatsApp Community