अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढला होता. या मोर्चात अंगणवाडी महिला कर्मचारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आता दोन महिन्यांपासूनचे पगार रखडले आहेत. त्यामुळे या महिला कर्मचा-यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे आम्ही सतत आमच्या हक्कांसाठी संघर्ष करायचा का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दोन महिन्यांपासून पगाराच्या प्रतिक्षेत
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे दोन महिन्यांपासूनचे पगार रखडले त्यामुळे या महिलांवर आता आर्थिक संकट कोसळले आहे. राज्यातील 1 लाख अंगणवाडी सेविका व 80 हजार मदतनीस दोन महिन्यापासून पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. जे मानधन दिले जाते ते पुरेसे नाही, पण तेही वेळेवर मिळत नसल्याने या महिला कर्मचा-यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
( हेही वाचा: आता राजीनामा दिला तरी तो मागे घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय )
महिला कर्मचा-यांमध्ये तीव्र संताप
अंगणवाडी कर्मचा-यांना दिला जाणारा पगार हा तुटपुंजा आहे. त्यात तो वाढवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलनही करण्यात आले. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. पगार वाटपाच्या प्रक्रियेत बदल झाल्याने दोन महिन्यांपासून पगार रखडले. याबाबत शासनाकडून अनेकदा चौकशी करुनही कोणताही उपाय शासनाने केला नाही. त्यामुळे महिला कर्मचा-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community