थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणा-या राणा दाम्पत्याच्या अडचणी अजून वाढणार असल्याचे समजत आहे. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर आता त्यांचे मुंबईतील घर मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर आले आहे.
राणांना नोटीस
मुंबई महापालिकेने आता राणा दाम्पत्याला मुंबई उपनगरातील खार येथील घराबाबत नोटीस बजावली आहे. सोमवारी महापालिका अधिका-यांनी राणांच्या घराची पाहणी केली. त्यानंतर महापालिका कायद्याच्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस महापालिकेने पाठवली आहे. राणा दाम्पत्याला या नोटीसला पुढच्या सात दिवसांत उत्तर द्यावं लागणार आहे. या नोटीसला उत्तर देताना कुठलंही ठोस कारण दाखवण्यात राणा दाम्पत्य अपयशी ठरले तर त्यांच्या या घरातील अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
BMC issues show-cause notice to Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana under section 351(1A) of the Municipal Corporation Act. pic.twitter.com/6TVwPPZNmK
— ANI (@ANI) May 10, 2022
राणा दाम्पत्याला तोडावे लागणार बांधकाम
सोमवारी, ९ मे २०२२ रोजी महापालिकेच्या पथकाने राणा दाम्पत्याच्या खार येथील घराची पाहणी केली. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या घराच्या मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. आठव्या मजल्यावर अवैधरित्या काम करण्यात आले असल्याचे महापालिका अधिका-यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महापालिका राणा दाम्पत्याला नोटीस पाठवणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त केलेले बांधकाम तोडावे लागणार आहे. अशाप्रकारे सध्या दिल्लीत असलेल्या राणा दाम्पत्याच्या मागे महापालिकेचा ससेमिरा सुरू होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Join Our WhatsApp Community