एप्रिलमध्ये कोळसा उत्पादनात लक्षणीय वृद्धी; 29 टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारची माहिती

139

कोळसा मंत्रालयाच्या अंदाजित आकडेवारीनुसार, एप्रिल, 2021 च्या 51.62 मेट्रिक टनाच्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 29% वाढून 66.58 दशलक्ष टन (एमटी) इतके झाले आहे. एप्रिल, 2022 दरम्यान, कोल इंडिया लि. (सीआयएल), सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) आणि कॅप्टिव्ह माईन्स/इतर यांनी अनुक्रमे 53.47 मेट्रीक टन, 5.32 मेट्रीक टन आणि 7.79 मेट्रीक टन कोळशाचे उत्पादन करून 27.64%, 9.59% आणि 59.98% ची वाढ नोंदवली.

(हेही वाचा – बच्चू कडूंच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी सुनावणी)

एप्रिल 2020 च्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये कोळसा पाठवण्याच्या प्रमाणात 8.66% ने वाढ झाली. ते 65.62 मेट्रिक टनावरून 71.30 मेट्रीक टन झाले. एप्रिल 2022 मध्ये सीआयएल, एससीसीएल आणि कॅप्टिव्ह/इतर यांनी अनुक्रमे 57.50 मेट्रीक टन, 5.74 मेट्रीक टन आणि 8.06 मेट्रीक टन कोळसा पाठवून 6.01%, 5.53% आणि 35.69% ची वाढ नोंदवली. शीर्ष 37 कोळसा उत्पादक खाणींपैकी 22 खाणींनी 100% पेक्षा जास्त कामगिरी केली आहे आणि इतर 10 खाणींचे उत्पादन 80 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान आहे. एप्रिल 2020 मधील 52.32 मेट्रीक टनाच्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये उर्जेसाठी पाठवलेल्या कोळशाचे प्रमाण 18.15% ने वाढून 61.81 मेट्रीक टन वर गेले आहे.

गेल्या महिन्यात 9.26% वाढ

गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीपासून कोळशाच्या आयात किमतीत घसरण दिसून आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय किमती अजूनही उच्च पातळीवर आहेत. कोळशावर आधारित वीजनिर्मितीत एप्रिल 2021 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 9.26% वाढ झाली आहे आणि मार्च 2022 च्या तुलनेत 2.25% वाढ झाली आहे. एप्रिल 2022 मधील एकूण वीजनिर्मिती एप्रिल 2021 मधील वीजनिर्मितीपेक्षा 11.75% जास्त आहे. मार्च 2022 मध्ये निर्माण झालेल्या उर्जेपेक्षा 2.23% जास्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.