भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या संकेतस्थळावरुन रेल्वेचे तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. आता बदलेल्या या नव्या नियमानुसार, प्रवाशांना आता तिकीट बुक करण्याआधी आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
IRCTC नुसार, नवे नियम हे त्याच युझर्सला लागू होणार आहेत, ज्यांनी कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर एकदाही रेल्वे तिकीट बुकींग केलेले नाही. मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफिकेशनविना कोणत्याही रेल्वे गाडीचे ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही.
असा करा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय
- IRCTCच्या वेबसाइट किंवा अॅपवर गेल्यानंतर व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा. व्हेरिफिकेशन विंडोवर आल्यानंतर तिथे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी रजिस्टर करा.
- स्क्रीनवर व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. त्यानंतर डाव्या बाजूला एडिटचा पर्याय दिसेल. काही बदल करायचे असतील, तर एडीट ऑप्शनवर क्लिक करुन बदल करु शकता.
- व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर, रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल. याचा वापर करुन मोबाईल नंबर व्हेरिफाय करता येईल. रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर एक कोड येईल. ज्याचा वापर करुन ई-मेल आयडी व्हेरिफाय करता येईल.