महागाईचा आलेख वाढता, महागाई उच्चांक गाठणार रॉयटर्सचा निष्कर्ष

140

इंधन आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती, सलग चौथ्या महिन्यात भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ठेवलेले व्याजदर कपातीचे धोरण यामुळे महागाई अधिकच वाढणार असल्याचा अंदाज राॅयटर्सच्या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. एप्रिलमधील महागाई दर 12 मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

काय सांंगतो अहवाल?

मार्चमध्ये होणा-या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांमुळे इंधनाच्या दरातील वाढ रोखून धरली होती. पण निवडणुकांनंतर इंधन दरातील वाढ वेगाने झाली. तसेच, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याच्या महागाईनेही मार्च महिन्यात उच्चांक गाठला. या स्थितीमुळे एप्रिलमध्येही भारतातील महागाई दर मार्चमधील 6.95 टक्क्यांवरुन एप्रिलमध्ये 7.5 टक्क्यांपर्यत वाढला, असे राॅयटर्सच्या 45 अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबर 2020 नंतरतचा हा सर्वोच्च महागाई दर असेल आणि रिझर्व्ह बॅंकेच्या 6 टक्के कमाल मर्यादेपेक्षा जास्त असेल.

( हेही वाचा National Technology Day 2022: …अन् जगात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली; जाणून घ्या इतिहास )

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 22 मार्च 2022 पासून इंधन दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची मोठी दरवाढ करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.