मनमाडमध्ये कार झाडावर आदळून भीषण अपघात; ४ ठार, १ गंभीर जखमी

167

बुधवारी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ एका झाडावर कार आदळून भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील चार मित्रांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मनमाड जवळ पुणे-इंदौर मार्गावर घडली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हे पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते, मात्र तेथून परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर मैदानात; गृहमंत्र्याची घेतली भेट)

हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर कारमधील पाचवा प्रवासी अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

तर या अपघातातील अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळीच पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत मात्र य़ा अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.