मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्रानंतर बुधवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यापूर्वी मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पोलीस सह आयुक्त यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. याभेटीदरम्यान, दोघांमध्ये सुमारे २० मिनीटे चर्चा झाली. त्यानंतर नांदगावकर शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांच्याभेटीसाठी गेले. यानंतर माध्यमांशी बोलतांना बाळा नांदगावकर म्हणाले मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर मैदानात; गृहमंत्र्यांंची घेतली भेट)
सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने घेतलेली भूमिका चांगलाच वादाचा विषय ठरत आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली आहे. या सगळ्यात आता राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
….तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही
या प्रकरणात नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी असे सांगितले की, गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले. मंगळवारी नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेतली, आणि त्यांना या पत्राची प्रतही दिली. पुढे नांदगावकर असेही म्हणाले, मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशीही बोलणे झाले आहे. हे पत्र कोणाकडून आले आहे, याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य केंद्र सरकरानेही घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community